कल्याण प्रतिनिधी
प्रदीप जाधव
कल्याण : दि. २ ऑगस्ट २०२६ कल्याण पूर्व येथील अशोकनगर, वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशन येथे आज (२ ऑगस्ट २०२६) राष्ट्रीय जातक बौद्धकथा संमेलन उत्साहात आयोजित करण्यात आले. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात देशभरातील बौद्ध अभ्यासक, वक्ते आणि समाजबांधव सहभागी झाले.
संमेलनाचे उद्घाटन भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात जातक कथा, बुद्ध धम्म, इतिहास, सामाजिक प्रबोधन तसेच समकालीन विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले.
आयोजकांनी या संमेलनाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार, जातक कथांचा अभ्यास आणि समाजात प्रबोधनाचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश व्यक्त केला. कल्याण आणि परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






