दिपक गायकवाड सर
संपादक निर्भिड आवाज न्युज
भाजप सरकार मूळभारतीयांच्या भारतात स्थापन झाल्या पासून संपूर्ण भारतीयांनाच हुकूमशाहीचे ग्रहण लागले होते. या हुकूमशाहीचे मनुवाद्यांचे स्वप्न तसे भारताच्या स्वातंत्र्या पासूनच होते. पण यावर त्यावेळच्या एका प्रज्ञावंत मानसाच्या सामाजिक देशभक्त चळवळीनेे पाणी फिरले. या प्रज्ञावंत सुपुत्राला त्यावेळी काॅंग्रेसनेही चांगली साथ दिली. यामुळेच डॉ आंबेडकरांना पं. नेहरूंच्या सहकार्याने भारतात लोकशाही स्थापित करता आली. यामुळे मूूळभारततीयांवरचे हुकूमशाहीचे संकट टळले. पण मनूवाद्यांच्या मनाततली मूळभारतीयांवर हुकूमशाही लादण्याची खुमखुमी काही जीरलेली नव्हती. तर ते हुकूमशाहीच्याच दिशेने आपली पावले संथगतीने व शांत डोक्याने उचलत होते. यासाठी त्यांनी हिंदत्व व मुस्लिम द्वेष हि दोन हत्यारे उपसली व हिंदू नावावर आपली हक्काची वोटबॅंक तयार करायला सुरवात केली. यात त्यांना पहिले यश बाबरी मशीद पाडण्यात मिळाले. याच बाबरी मशीद चळवळीत त्यांनी राम नामावर बहुजन जनता भावनात्मक बनवून पूढील हुकूमशाही स्थापनेच्या चळवळीला सर्वात जास्त पैसा कमवला. यामुळे त्यांचे यातून मनोबल वाढले व फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेेरणेने मूळभारतीय समाज कितीही शहाणा झाला असलातरी, ब्राम्हणी कावा समजून घेेण्याइतपत शहाणा झालेला नाही हे त्यांना समजून आले. यामुळे त्यांनी आपल्या हिंदूत्ववादी आरएसएस प्रणीत विश्व हिंदू परिषद,बजरंग दल यासारख्या कट्टरवादी संघटनांचे एक संमेलन २००२ला वाराणशीत भरवले व यातून त्यांनी एक २४ कलमी कार्यक्रम आखला व त्याचे पत्रक गुप्तपणे फक्त संपूर्ण भारतातील आपल्या ब्राह्मण वर्गापर्यंतच पोहच केला. पण हे पत्रक कणत्यातरी बहुजन माणसाच्या हाती लागले व ते त्याच गुप्त मार्गाने माझ्यापर्यंत आले व मी ते पुणे येथील विलास वाघ यांच्या सुगावा मासिकामध्ये माझ्या नावावर प्रकाशित केले. यानंतर तेच पत्रक दैनिक सम्राट मध्येही प्रकाशित झाले व नतंर ते मोबाईलवर सारखे फिरत राहिले. पण ब्राम्हणी हिंदूत्वाने आंधळे झालेल्या हिंदूत्ववादी अंधभक्तांना ते समजले नाही किंवा त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. पण विशेष म्हणजे याच हिंदूत्ववादी अंधभक्तांनी २०१४ला याच भाजपला भरभरून मतदान केले व त्यांना हुकूमशाहीचा मार्ग मोकळा करून दिला. भारतात हुकूमशाही आणण्याचे स्वप्न मनूवाद्यांचे केंद्रीय सत्तेपर्यंत पोहचल्यावर पूर्ण झाले खरे पण, ते आणायचे कसे? हा प्रश्न त्यांना सतावू लागला. नव्हेतर याने त्यांना धडकीच भरली. कारण भारतीय जनता ही सहा दशके लोकशाहीत वावरलेली आहे व लोकशाही त्यांच्या रक्तातही मिसळलेली आहे. तेंव्हा सरळ लोकशाही घालवून सरळसरळ हुकूमशाही आणणे धोक्याचे आहे. जर तसे केले तर याचा सर्वात जास्त फटका ब्राह्मण वर्गाला बसेल व जर कधी यामुळे भारतात क्रांतीची लाट उसळली तर त्या हुकूमशाहीला पेशवाई हे नाव मिळेल आणि मग इंग्रजांनतंर साठ वर्षांनी का होईना भारतातील परकीय म्हणून ब्राम्हणांना हा देश सोडून चालते व्हावे लागेल. असे होऊ नये म्हणून मनूवाद्यानी मूळभारतीय माणसांच्या हातूनच मूळभारतीयांवर हुकूमशाही आणण्याचे सोपे व मध्यम धोरण स्वीकारले. या कसोटीवर उतरणारा व आपले स्वप्न साकार करणारा आणि कमी शिकलेला पण स्वकियांवर शस्त्र चालवूून त्यांचे रक्ताचे पाट वाहण्यास लावणारा एकचघ भडक डोक्याचा माणूस त्यांच्याकडे होता आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी होय. कारण या इसमाने गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना हिंदू विरुद्ध मुस्लिम असा दंगा पेटवून तिथे रक्ताचे, अन्याय अत्याचाराची सिमा गाठल्याचे सरळ प्रात्यक्षिक करून दाखवलेले होते. यामुळे हा इसम पंतप्रधान पदास लायक आहे यावर मनूवाद्यांचे एकमत झाले व त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. याप्रकारे भारतात मनूवादी सत्ता स्थापन झाल्यावर मनूवाद्यांनी आपले स्वप्न पडद्यामागून साकार करायला सुरुवात केली. यासाठी आरएसएसच्या दूस-या सरसंघचालक गोळवलकराने भारताचे हिंदूस्थान करण्याठी जे जे उपाय सांगितलेले होते ते राबवायला सुरवात केली. यात गोळवलकरने जनता भिकारी बनवण्याचे व भाकरीचा तुकडाच कसा विकास वाटेल याचा जो महामंत्र दिला होता,तो महागाई वाढवून गिरवण्याचा पहिला प्रयत्न सुरू झाला. तसेच दूसरा गुरुमंत्र म्हणजे देशाची संपूर्ण आर्थिक सत्ता एकाच माणसाच्या स्वाधिन करण्याचा होता व त्यापद्धतीने त्यांनी अदाणी व अंबाणी जवळ केला. तसेच आपल्या मंत्र्यांनाही चरण्याचे कुरण मोकळे करून दिले. यामुळे जे मूळभारतीय नेते या सरकारमध्ये सामील झाले ते फेकलेल्या तुकड्यावर ताव मारून आपल्याच बांधवांवर भुंकू लागले. यामुळे कुंपनच शेत खायला लागल्यावर आम जनतेला कोणी वालीच राहिला नाही. प्रत्येकजन या परकीय सत्ताधिशांचा गुलाम झाला व आपल्या स्वार्थासाठी आपल्याच बांधवाचे न्यायहक्क दाबू लागला. यातून तरूूणवर्गही सुटला नाही. स्पर्धा परिक्षांचचे नियोजन करण्याचे काम फक्त सरकारने केल. पण हे करताना त्यांच्यापूढे आपल्या आश्रयाखाली आलेल्या प्रत्येक नेत्याला त्याचा वाटा कसा द्यायचा हा मोठा प्रश्न तयार झाला. कारण प्रत्येक नेत्याला आपला मुलगा, नातेवाईक त्या त्या उच्चपदावर बसवायचा होता. यासाठी आमतरूणांना डावालूून आपलीच मुले, नातलग मा-याच्या जागांवर बसवण्यासाठी पेपरफुटीचे कारस्थान घडवून आणणे गरजेचे होते. तो मार्ग पत्करून त्यांनी खेळ सुरू केला. पण त्यांना याची परत आतून मनातून भीती वाटू लाइली. कारण जर असे वारंवार झाले तर देशातील तरूणवर्ग स्वस्थ बसणार नाही. तो न्यायालयात जाईल. मग यातून वाचण्यासाठी तेथील न्यायधीशही आपल्याच विचारांचा व सरकारच्या बाजूूचा असावा लागेल. यासाठी त्यांनी आपल्या विचारांचे व बाजूचे हूकमी ऐक्क्याचे न्यायधीश त्यांनी तेथे बसवले. आता हे न्यायधीश सर्वोच्च स्थानी बसवण्या मागेही त्यांची दुहेरी चाल होती. कारण भारतातील लोकशाहीच्या जागी हुकूमशाही आणण्यासाठी व तसा न्याय देण्यासाठी आणि लोकशाहीतील संविधानिक कायदे मोडित काढण्यासाठी त्यांना या न्याधीशांची गरज लागणारच होती. तसेच न्यायाच्या बाजूनेच आपल्याला हुकूमशाही आणता येईल यावरही त्यांचे दृढ एकमत होते. यामुळेच त्यांनी न्यायव्यवस्थेत ही हेराफेरी मोठ्या हिकमतीनेे व दूरदृष्टीने केलेली आहे. पण हेच न्यायधीश सरकारच्या बाजूने काम करतोय हे दाखवण्याच्या नादात भारतीय तरूणांना काॅक्रोच ( झूरळ) बोलून बसले आणि भारतीय तरूण वर्गात संतापाची लाट उसळली. याच संधीचा फायदा तीक्ष्ण, चालाख व बुद्धीवंत अभिजित दिपकेंनी उचलला व याच भाषेत या मनूवादी सरकारला उत्तर देण्याचे ठरवले आणि त्याने त्यासाठी काॅक्रोच जनतता पार्टिच्या नावाखाली भारतीय तरूणांना एकसंघतेची हाक दिली. त्याला उत्स्फूर्त साद मिळाली व या सरकार विरोधात तरूणांच्या मनमस्तकात क्रांतीचा आगडोंब उसळला. याचे परिवर्तन दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरील उपोषणात झाले. पण हे उपोषण या सरकारणे मणिपूर हत्याकांड, पंजाब शेतकरी हत्याकांड यांना चिरडण्यात जी भूमिका बजावली होती त्याच मार्गाने चिरडण्याचा निर्णय घेतला. तरूणांवर लाठीचार्ज, अश्रूधूर यांचा मारा करण्यात आला. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली व या सरकारलाच ‘ चले जाव ‘ चा इशारा देण्यात आला. शिक्षणमंत्र्याचा राजीनामा या मागणी बरोबरच पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीही पूढे आली व जोर धरू लागली. यामुळे जर पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले तर मूळभारतीयांना वेठीस ठेवणारा व त्यांना परकीय मनूवाद्यांचे गुलाम बनवणारा दूसरा पंतप्रधान परत मिळणार नाही व ब्राह्मण पंतप्रधान बनवून त्याच्या हातून हे कार्य करवून घेता येणार नाही. आणि तसे केले तर आलेले सरकार तर जाईलच पण संपूर्ण भारताच्या समाजव्यवस्थेत ब्राह्मण वर्ग बदनाम होईल. तेंव्हा काठी न तूटता पाव्हण्याच्या काठीने साप मारणे कधीही चांगलेच राहिल. असा पूढचा दिर्घकालीन विचार करून शिक्षणमंत्र्यालाच राजीनामा देण्यास भाग पाडले. यामुळे तरूणात समाधानाचे वातावरण निर्माण होईल व या समाधानाचा भविष्यात योग्य बदला घेण्यास तोच पंतप्रधान परत त्याच पदावर कायम राहिल. असा विचारपूर्वक निर्णय घेऊनच हि रणनीती आखण्यात आली. .. पण यात अभिजित दिपकेची भूमिका निर्णायक ठरली. त्याचे नेतृत्व करण्याची क्षमता व तरूणात जिद्द पेरण्याची क्षमता ही कौतुकास्पद आहे. कारण दीड महिना आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर लाखो तरूणांना सोबत ठेवणे, तसेच तरुणाईच्या ताकदीचा किंवा त्यांच्या पाठींब्याचा कोणताही तोरा न मिरवता सरकारच्या प्रत्येक कारवाईला व प्रश्नाला धीरगंभीरपणे जबाब देण्याची क्षमता हिच मूळात त्याच्या बौद्धिक नेतृत्वाची कसोटी आहे. ती त्याने योग्य प्रकारे जाणत्या व अनुभवी नेत्यापैक्षाही कौशल्याने वापरली यातच त्याच्या ख-या नेतृत्वाचा विजय आहे. कारण स्वत:च्या गळ्यात स्वतःच्याच हाताने नेतेपणाची माळ घालणारे व स्वतःच्याच हाताने स्वत:चीच पाठ उलट्या हाताने थोपटणारे नेते भारतीय जनतेने आजपर्यंत पुष्कळ बघितले आहेत. पण एवढ्या धीरगंभीरपणे देशाचं नेतृत्व करणारा आजपर्यंत फक्त अभिजित दिपकेच जनतेने पाहिला असे म्हणल्यास ते वावगे ठरणार नाही. असे बुद्धीवंत नेतृत्व भारतीयांना मिळणे हि काळाची गरज होती. ती अभिजित दिपकेच्या रूपाने संपूर्ण भारतीयांनी अनुभवली. म्हणून अभिजित दिपके हा क्रांतीसूत आहे. कारण त्याच्या पहिल्याच विजयाने संपूर्ण देश आनंदला. कारण ज्या हुकूमशाही सरकारपूढे भल्याभल्या नेत्यांनी शरणागती पत्करली, त्या सरकारला लोकशाहीचा धडा शिकवणे हि काळाची गरज होती. ती कामगिरी या एका तरूणाने आपल्या बौद्धिक कौशल्यावर केली. याचा आनंद आज जसा भारतीयांना झाला, तसाच आनंद त्याने ज्या मातापित्याच्या पोटी घेतला त्यांनाही झाला असेल. म्हणून तो जसा त्याच्या आईवडीलांचा क्रांतीसूत आहे, तसाच तो संपूर्ण भारतीयांचाही क्रांतीसूतच आहे, हे आता जवळजवळ निश्चित झालेलेच आहे.





