परळी वैजनाथ : दि. ३१ जुलै २०२६ परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथे भारतीय बौध्द महासभा तथा सम्राट अशोक बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास निमित्ताने कन्हेरवाडी येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाचे उद्घाघाटन करण्यात आले.
कन्हेरवाडी गावातील सम्राट अशोक बुद्ध विहारात भारतीय बौध्द महासभा तथा सम्राट अशोक बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास निमित्ताने दि. २९ जुलै २०२६ आषाढ पौर्णिमा ते २६ ऑक्टोबर २०२६ अश्विन पौर्णिमा या त्रैमासिक काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात येणार आहे . वर्षावास निमित्ताने हा उपक्रम कन्हेरवाडी येथे राबविण्यात आला असून या उपक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र राज्याचे सचिव आयु. भास्कर नाना रोडे ,आयु. गंगाधर आप्पा रोडे , भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका संरक्षण उपाध्यक्ष आयु.सिध्दोधन छाया भारतराव घाटे, सामाजिक कार्यकर्ते आयु. बाळू रोडे, आयु. दत्ता प्रधान,आयु. लहूदास रोडे , आयु.भीमराव आचार्य, आयु. श्रीराम हनवते यांच्यासह सम्राट अशोक नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते






