महेंद्र गोदाम
अंबाजोगाई प्रतिनिधी
“स्व. अजितदादा पवार यांची काम करण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेचे भान ठेवणारी होती. प्रशासनावर त्यांची पकड होती आणि कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या याच शिस्तीचा आदर्श घेऊन आपले करिअर घडवावे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी केले.
घाटनांदुर येथील वसुंधरा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अंबाजोगाई) आणि वसुंधरा महाविद्यालयराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अंबाजोगाई) आणि वसुंधरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्व. अजितदादा पवार यांची जयंती आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ‘लोकनेते स्व. अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
स्व. अजितदादांची स्वप्ने पूर्ण करणार: संजय दौंड
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार संजय दौंड यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला. “दादांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनसेवा सप्ताहासारख्या उपक्रमांतून पूर्ण करतील,” असे ते म्हणाले.
यावेळी परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, तालुकाध्यक्ष राजेभाऊ औताडे आणि आंबा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ता पाटील यांनीही विचार मांडले.
विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार
कार्यक्रमात १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह NEET, JEE, MBA आणि G-SET परीक्षांमध्येपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल चंदनवाडीचे आदर्श सरपंच ज्ञानेश्वर गिते, उत्कृष्ट शेतकरी हनुमंतराव आगळे, शिक्षक व पत्रकार शिवकुमार निर्मळे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, पत्रकार अ. र. पटेल, प्रा. सुरेश मोदी, प्रा. अनंत कांबळे, ऋषिकेश मुंडे आणि पैलवान विजय गिते यांना स्व. अजितदादा पवार सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर चाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मकरंद जोगदंड यांनी तर आभार प्रभारी प्राचार्य डॉ. अर्जुन मोरे यांनी मानले.
या प्रसंगी बबनराव लोमटे, शिवाजीराव शिरसाट, अजित गरड, गुणवंतराव आगळे, मनोज गगणे, बाळासाहेब देशमुख, प्राचार्य व्ही. एल. गिते, मेहबूब शेख, बालासाहेब शेप, बाबासाहेब इंगळे, वामन जाधव, डॉ. अब्दुल समद, संजीवनी देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिक्षक, नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.




