मंठा प्रतिनिधी भीमचंद्र प्रधान
मंठा: दि. 29/06/2026 रोजी मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालय तालुका मंठा जिल्हा जालना येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या दोन्ही संयुक्त विभागामार्फत महात्मा संत कबीर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महात्मा संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी संत कबीर यांनी मानव कल्याणासाठी केलेल्या कार्यावर महाविद्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उजाळा टाकला या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते





