रामकिसन अवधूत
जालना प्रतिनिधी
अंबड : दि. ०९ ऑगस्ट २०२६ शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या अंबड तालुका संघटकपदी सुखापुरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकभाऊ बोटे यांची निवड करण्यात आली असून, पत्रकार श्री. राजेंद्र मोताळे यांची अंबड तालुका सहसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हिकमत दादा उढाण यांच्या माध्यमातून दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
अशोकभाऊ बोटे हे सुखापुरी परिसरात सामाजिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकार राजेंद्र मोताळे हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अंबड तालुक्यात शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी गावागावांत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, पक्षाच्या विचारांचा व शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा जनतेपर्यंत प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अशोकभाऊ बोटे व पत्रकार राजेंद्र मोताळे यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच सुखापुरी व अंबड तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील संघटनात्मक कार्यासाठी विविध स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.



