अंबाजोगाई
प्रतिनिधी
बीड : दि. १६ जून २०२६ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी याठिकाणी छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेने सराईत मोटर सायकल चोराला अटक करून जेरबंद केले.
बीड जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एल.सी.बी.) पथकाने मोठी कारवाई करत. अंबाजोगाई येथून एका सराईत दुचाकी चोराला अटक केले असून, त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या एकूण ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांना माहिती मिळताच त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक दुचाकी चोरांचा शोध घेत होते. दरम्यान, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, संतोष बाबासाहेब मुंडे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) हा व्यक्ती बीड व शेजारील जिल्ह्यांतून दुचाकी चोरून त्या आपल्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवत आहे.पोलिसांचा छापा आणि मुद्देमाल जप्तमिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ जून २०२६ रोजी वरवटी येथे छापा टाकून संतोष मुंडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने वेगवेगळ्या ठिकाणांवरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवलेल्या ६ मोटारसायकली जप्त केल्या. यामध्ये अंबाजोगाई शहरातून २, पुण्यातून १, लातूरमधून १ आणि परभणीमधून २ दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे.तीन गुन्हे उघडजप्त केलेल्या दुचाकींच्या पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:१) पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर – गु.र.नं १३२/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस२) पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर – गु.र.नं ३२४/२०२५ कलम ३०३(२) बी.एन.एस३) पोलीस ठाणे गंगाखेड जि. परभणी – गु.र.नं २९/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एसइतर तीन मोटारसायकलींबाबत अंबाजोगाई शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. या पथकाने केली कारवाईही धडक कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे व चालक अतुल हराळे यांनी केली आहे. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.






