
अकोला प्रतिनिधी
अकोला : दि. १६ जून २०२६ अकोला परिसरातील बाभुळगाव या गावात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन चाकी गाडीचा धक्का लागल्याचा खोटा आरोप करून,बौद्ध समाजातील काही तरुणांना मारहाण करण्यात आली. बाभूळगाव गावातील दुसऱ्या गटातील लोकांनी मारहाण करत शिवीगाळ केली त्यानंतर.बौद्ध समाजातील तरूण बुद्ध विहाराकडे गाडीनं जात असताना त्यांच्यावर हल्ला करत सात ते आठ जणांनी बुद्ध विहारावर दगडफेक केली. या दगडफेकीत बुध्द विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीचा काही तुटला असून या घटनेने बाभूळगाव आत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती गावातील बौध्द समाजातील नागरीकांनी बाभुळगाव एम.आय.डी.सी.पोलिस ठाणे याठिकाणी सर्व घटनेची माहिती दिली आणि बाभूळगाव गावातील बौध्द विहारावर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एम आय डी सी पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करत तीन ते चार आरोपींना पोलिसांनी अटक केले असून इतर आरोपींना ही लवकरात लवकर अटक करावे अन्यथा संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलिस प्रशासनाला बाभूळगाव येथील बौध्द समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.





