
मुंबई : दि. १६ जून २०२६ रोजी मुंबईतील दादर येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवन याठिकाणी अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणा विरोधात महत्वाची समन्वय बैठक पार पडली या बैठकीत आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब आणि इतर विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या अनुसूचित जाती (एस.सी.)आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी चळवळ आणि अनुसूचित जातींतील ५९ जातींच्या विविध संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यापूर्वी विविध संघटनांनी स्वतंत्रपणे जाहीर केलेले सर्व मोर्चे आता एकत्रित करण्यात आले असून, ३० जून २०२६ रोजी मुंबईतील राज्य विधिमंडळावर एकच ऐतिहासिक संयुक्त महामोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
बीड येथून निघालेल्या लाँग मार्च आंदोलनासह सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेने जाहीर केलेले आंदोलन आणि इतर संघटनांचे मोर्चे आता एकत्र येणार आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम सण लक्षात घेऊन आणि सर्वांच्या सहमतीने २६ जूनऐवजी ३० जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या समन्वय बैठकीत विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
संविधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि अनुसूचित जातींची एकता अबाधित ठेवण्यासाठी आता सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करूया.





