परभणी प्रतिनिधी
परभणी : दि. १३ जून २६ परळी वैजनाथ येथील तौहिद खान यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. परळी वैजनाथ शहरापासून १५ ते २० किमी अंतरावरावरील लेंडेवाडी जवळील रेल्वे रूळावर तौहिद खान यांचे प्रेत अपघात असल्याचे भासवण्यासठी टाकण्यात आले मात्र घटनेनंतर दोन दिवसात या प्रकरणाचे गुण उलगडले आणि हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. तौहिद खान हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केले असून परळी वैजनाथ येथील प्रथम दंड न्यायालयात आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. मात्र तौहिद खान यांच्या हत्ये प्रकरणी निःपक्षपाती पणे तपास व्हावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून भेट घेतली यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी तोहीद खान यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पीडित कुटुंबीयांसोबत वंचित बहुजन आघाडीचे परभणी महानगर अध्यक्ष मुदस्सिर असरार, जिल्हा महासचिव मुजफ्फर खान, बीड जिल्हा महासचिव मिलन साहेब, बीड शहराध्यक्ष, तोहीद खान यांचे भाऊ तसेच गफ्फार साहेब उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. ॲड. बाळासाहेब आंबेडकर परळी येथे येणार असून तोहीद खान प्रकरणात न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देणार आहेत.
तोहीद खान यांना न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. आम्ही कायदेशीर, लोकशाही आणि संविधानिक मार्गाने न्यायासाठी संघर्ष करत राहू. कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडता दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची ठाम भूमिका आहे. अन्यायाविरुद्धचा हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील






