मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दि. १२ जून २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मुंबई येथे मंत्रालयावर NEET पेपर लीक प्रकरण आणि त्याला जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी “विद्यार्थी आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. राज्यभरातून विद्यार्थी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
शांततापूर्ण मोर्चा सुरू असताना पोलिसांकडून मोर्चा दडपण्यासाठी केलेल्या बळाच्या वापरामुळे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिस कोणाच्या आदेशावरून आंदोलन दडपवत होते? इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांना पोलिसांनी सहकार्य केले, मग सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मोर्चावरच दडपशाहीची कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांना दुखापत झाली आहे. सरकारकडून पोलिसांचा वापर करून कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी सम्यक विद्यार्थी आंदोलन आपला लढा सुरूच ठेवेल
असे मत वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, युवा आघाडी तथा महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले.





