परळी वैजनाथ प्रतिनिधी :
परळी वैजनाथ : दि. १० जून २०२६ परळी वैजनाथ शहरातील काही खाजगी रुग्णालयातील डॉक्टर म्हणजे रूग्णांच्या मजबूरीचा फायदा घेऊन रूग्णांना लुबाडणारे लुटारू रूग्णांना पैशासाठी मरणाच्या वाटेवर सोडणारे यमदूतच म्हणावे लागेल. परळी वैजनाथ शहरातील बहुतांश डॉक्टर हे रुग्णांचा एवढा छळ करत आहेत की अक्षरशा रुग्णाचा मृत्यू झाल्यास सुद्धा एक-दोन दिवस ऍडमिट ठेवून प्रचंड मोठी लूट करत आहेत अशा नालायक आणि डॉक्टरी पेशाला काळींमा लावणाऱ्या डॉक्टरांच्या पदव्या रद्द करून दवाखान्याचे परवानेसुध्दा शासनाने रद्द करणे गरजेचे आहे. परळी वैजनाथ शहरातील बहुतांश खाजगी रुग्णालयांची आणि डॉक्टरांच्या प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे काही रुग्णालयात खाजगी रुग्णालयाने शासकीय योजनेचा लाभ रुग्णांकडून प्रचंड मोठी लूट केल्यानंतर त्याच रुग्णाच्या नावे आरोग्य सेवेतील सरकारी योजनेचा करोडो रुपयाचा निधी किंवा लाभ हडप केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही काही खाजगी रूग्णालयात रुग्णाकडून बिल वसूल करूनही शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या परळी वैजनाथ शहरातील डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी परळी वैजनाथ शहरातील जनतेतून येत आहे. त्याचबरोबर कोरोना काळात परळी वैजनाथ शहरातील काही खाजगी रूग्णालयात शासनाने कोव्हीड सेंटर दिले होते. त्या रूग्णालयात कोरोना व्हायरसच्या रुग्णांकडून रेमडिसिव्हीर या इंजेक्शनची शासनाच्या किंमतीपेक्षा पाच ते दहा पटीने किंमत घेऊन काळा बाजार करत अनामत प्रॉपर्टी आणि प्रचंड पैसा परळी वैजनाथ शहरातील काही नामवंत डॉक्टरांनी कमावला आहे. अशा डॉक्टरांची आतापर्यंत चौकशी झालेली नाही तेव्हा बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाने या सर्व परळी वैजनाथ शहरातील डॉक्टरी पेशावर जातीने लक्ष देऊन करवाई करावी. दवाखान्यात दाखल असलेल्या रूग्णांची मोठी लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपयाचा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा यामुळे हे डॉक्टरांनी प्रचंड मोठी संपत्ती कमवून बसले आहेत आणि सध्याही खाजगी रूग्णालयात रूग्णांना लूट त्यांचे धंदे चालूच आहेत. तसेच परळी वैजनाथ शहरातील रुग्णालय ऑनलाइन बिल घेत नाहीत प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन बील घेतले जाते तर परळी वैजनाथ येथील खाजगी रुग्णालयात का घेतले जात नाही असाही प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. परळी वैजनाथ शहरातील खाजगी रूग्णालय आणि तेथील डॉक्टर शासनाचे जावई आहेत का ? असाही प्रश्न सामान्य जनतेतून येत आहे. बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाने परळी वैजनाथ शहरातील अशा सर्व खाजगी रूग्णालयांचे परवाने आणि डॉक्टरांच्या पदव्या रद्द करून सामान्य जनतेला न्याय द्यावा.






