सिध्दार्थ घाटे
जिल्हा प्रतिनिधी
बीड : दि. १ मे २०२६ रोजी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतीय बौध्द महासभा तथा समता सैनिक दल यांच्या वतीने धम्मरॅली तथा धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात दि. १ मे २०२६ रोजी जगाला शांतीचा संदेश आणि मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा तथा समता सैनिक दल यांच्या वतीने भव्य धम्म रॅली आणि धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म रॅली धम्म देसनेसाठी पुज्य भिक्खू धम्मबोधी वैशाली बुध्दभूमी अजनी व पुज्य भिक्खू मोग्गलायन महाबोधी बुद्धविहार पोखर्णी जिल्हा परभणी यांची धम्म देसना होणार असून परळी वैजनाथ शहरातील आणि परळी वैजनाथ तालुक्यातील बौध्द उपासक , उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच धम्म रॅलीत सहभागी होउन धम्मदेसनेला उपस्थित रहावे. दि १ मे २०२६ शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता परळी वैजनाथ शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते मोंढा रोड मार्गे एकमिनार चौक, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकासमोरील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्म रॅलीचा समारोप होउन त्याठिकाणी पुज्य भिक्खू यांची धम्म देसना होणार असून या कार्यक्रमासाठी परळी वैजनाथ शहरातील आणि परळी वैजनाथ तालुक्यातील बौध्द उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौध्द महासभा तथा समता सैनिक दल यांच्या वतीने करण्यात आले आहे.





