
. नांदेड :मौजे , ता. लोहा येथील जायकवाडी वसाहतीमध्ये सन 1992 पासून पंचशील ध्वज व बुद्ध विहारासाठीची जागा अस्तित्वात आहे. सदर जागा मूळ शासकीय मालकीची असून, चौकशीअंती लोहा नगरपरिषदेने सन 2024 मध्ये नमुना नं. 47 च्या उताऱ्यावर मालमत्ता क्र. 2372 मध्ये 9840 चौ.मी. क्षेत्र बुद्ध विहाराची जागा म्हणून अधिकृत नोंद घेतली आहे. सदर जागेवर आजतागायत बौद्ध धर्मीयांचे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम डाॅ.बाबासाहेब अंबेडकर याची जंयतीचे आयोजित करण्यात आले होते.परंतु, सदर जागेलगत नांदेड-लातूर महामार्ग झाल्याने जमिनीचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपये झाल्याने, नगरपरिषदेतील काही पदाधिकाऱ्यांनी समाजास कोणतीही पूर्वसूचना न देता कोनतीही सुनावनी न घेता एप्रिल 2024 मध्ये नमुना नं. 47 च्या उताऱ्यावरील सदर नोंद काढून टाकली. त्यानंतर दिनांक 21 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास सद्यस्थितीतील जागा मालकाने काही समाजकंटकांना सोबत घेऊन सदर ठिकाणचा पंचशील ध्वज व ‘बुद्ध विहाराची जागा’ असा उल्लेख असलेली नामफलक पाटी बेकायदेशीरपणे काढून टाकली.सदर कृत्य हे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन व प्रा.राज अटकोरे यानी जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी याच्या कडे केली आहे. तसेच हे शासकीय मालमत्तेचे व धार्मिक स्थळाचे विद्रुपीकरण आहे.तरी, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्ती व त्यास सहकार्य करणाऱ्या संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये सात दिवसांच्या आत फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच सदर जागेवरील अतिक्रमण हटवून पंचशील ध्वज व बुद्ध विहाराची पाटी पूर्ववत बसविण्याचे आदेश देण्यात यावेत.मागणीची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा हि ईशारा वंचित बहुजन आघाडी कडुन देण्यात आले.






