सिध्दोधन घाटे
परळी वैजनाथ
दि. १४ मे २०२६ बीड जिल्ह्यातील वाढलेल्या तापमानामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले असून उष्माघाता सारख्या आजाराला बळी पडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात वाढ झाली असून पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, अकोला, परभणी, लातूर, बीड , उस्मानाबाद, संभाजी नगर, हिंगोली महाराष्ट्रातील अशा अनेक जिल्ह्यातील तापमानात ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्र शासनाने नागरिकांना दुपारी १ ते ५ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे सांगितले आहे.दुपारच्या वेळी तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघातासारख्या आजाराला बळी पडावे लागते तेव्हा शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी गरज असेल तरच डोक्यावर छत्री किंवा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेऊनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.






