दि. २२ एप्रिल २०२६ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील कन्हेरवाडी गावात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.



परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले तथा विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा शाखा परळी वैजनाथ बीड पूर्वच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून यश प्राप्त केले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनां आपल्या महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची माहिती मिळावी सर्व महापुरुषांना गायनातून निबंधातून आणि भाषणातून समजून उमजून घ्यावे यासाठी खालील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा यासाठी भारतीय बौध्द महासभा शाखा परळी वैजनाथ बीड पूर्वच्या वतीने दि. २१ एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तथा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या गुणगौरव सोहळा समारंभ प्रसंगी भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुक्याचे अध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे सर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आयु. भास्कर नाना रोडे, भारतीय बौध्द महासभा तथा समता सैनिक दलाचे परळी वैजनाथ तालुका संरक्षण उपाध्यक्ष आयु. सिध्दोधन घाटे औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आयु रवि भालेराव सर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोनेरी सर सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.




