दिपक गायकवाड
निर्भिड आवाज न्युज संपादक
आहिल्यानगर : दि. ०८ ऑक्टोबर २०२६ सध्या महाराष्ट्रात उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काही महिने उलटून गेली तरी दोन्ही बाजूकडून आरोपांच्या फैरी झडत आहेत. काही बुद्धीमंत दोन्ही समाजाला सबुरीचा सल्ला देवून, ' फुले - शाहु - आंबेडकरांच्या योग्य विचार मार्गावरती या ' असा सल्ला देत आहेत. पण मातंग समाज व या समाजाचे स्वयंघोषित नेते इतके हिंदूत्वाच्या मार्गाने इतक्या जोरात चालले आहेत की, ते सत्य विचारांचा मेंदू बाजूला ठेवून स्वतःच्या फायद्याच्या गणिताची आकडेच जूळवत आहेत. यामुळे परिस्थिती दोन्ही समाजांच्या हाताबाहेर जाते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. यात बौद्ध समाज मैदानात उतरल्या सारखा वाटत असला तरी तो संविधानिक व मेंदू ठिकाणावर ठेवून आपले जबाबदारीने वक्तव्य करताना दिसत आहे.
या उपवर्गीकरण प्रकरणात सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की, अनु.जाती वर्गातील ज्या ५९ जाती आहेत , त्यातील ५८ जाती या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत तर, एकटी व एकच मातंग जात उपवर्गीकरणाची मागणी करत आहेत. यामुळे उपवर्गीकरण कदापी होणार नाही हि काळ्या दगडावरची रेषा आहे. त्यात दूसरा मुद्दा म्हणजे याच वर्गातील चर्मकार बांधव महाराष्ट्र संघटनेने तर सरळ महाराष्ट्र सरकारलाच इशारा दिला आहे की, ' जर उपवर्गीकरण झाले तर, आम्ही सर्व चर्मकार बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेणार व बौद्ध धम्मात धर्मांतर करणार. ' यामुळे महाराष्ट्र सरकारच्या हिंदूत्ववदी धोरणाला व अजेंड्याला हे काही परवडणारे नाही. उलट असे झाले व चर्मकार बांधवांनी बौद्ध धम्म स्विकारला तर, इतरही उपवर्गीकरणाच्या विरोधातील ५८ जाती त्याच मार्गावर पाऊल ठेवून बौद्ध धम्मात धर्मांतर करतील. हेच नेमके हिंदूत्व वाद्यांना नको आहे. उलट पूढे भविष्यात हिंदूराष्ट्र संकल्पना अस्तित्वात उतरलीच तर भारतीय समाज व्यवस्थेतला कोणता समाजवर्ग अस्पृश्य म्हणून ठरवता येईल, याचीही चाचपणी याच उपवर्गीकरण लढ्यातून अजमावण्याचे प्रयत्न व अंदाज केले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या अंदाजाला यश येत आहे व मातंग जात त्यांच्या सर्वच बाबतीत गळाला लागलेली आहे. पण याचे भान व इतक्या दूरदृष्टीचा अभाव मातंग बांधवात व त्यांच्या गल्लाभरू कमाई करणा-या नेत्यांत नाही.
मातंग बांधवांच्या नेत्यांची एक प्रमुख ओरड हि आहे की, बौद्धांनी आमच्या वाट्याचे आरक्षण खाल्ले व आम्हाला काहीच मिळाले नाही. आता या म्हणण्याचा मातंग बांधवांनीच आत्मशोध केला तर आपल्या वाट्याचे का खाल्ले हे समजून येईल. कारण शिक्षण हि आरक्षणाला प्रमुख अट असते व त्या अटी बौद्धांनी शैक्षणिकदृष्ट्या पूर्ण केलेल्या होत्या व आजही आहेत.पण हे सर्व होत असताना शैक्षणिक आरक्षणातून आपल्या लहान भावाला काही देता येत नाही , म्हणून बौद्धांनी मातंगाना राजकीय आरक्षणात सामावून घेतले. यामुळेच ते आमदार, खासदार व मंत्री झाले. येवढे उपकार तर बौद्धांनी इतर कोणत्याच अनु.जातीच्या जात बांधवांवर केले नाहीत. तरी ते आज त्यांच्या मोठ्या भावाबरोबर म्हणजे बौद्धां बरोबर आहेत. ते मातंगा सारखे खाऊन कृतघ्न आजच्या इतके कधीच झाले नाही. एवढेच नाही तर बौद्धांनी जातीयतेच्या लढ्यात मांतगांना जेवढे संरक्षण दिले तेवढे बौद्धांनी कोणाला दिलेही नाही. भोतमांगे हत्याकांड प्रकरण बौद्धांनी लढले. त्यासाठी महाराष्ट्र बंद ठेवला व अखेरपर्यंत लढून न्याय मिळवून दिला. त्यावेळेस तर मातंग समाज भोतमांगे कुटूंबच बौद्ध समजत होते व ते मातंग आहेत हेही पुरते त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे ते बौद्ध रस्त्यावर उतरून लढाई लढत असताना बाजूला हात बांधून बौद्धांची लढाई पहात होते. असेच दूसरे प्रकरण साता-याच्या मातंग सरपंचाने गावच्या जत्रेत डफडे वाजवले नाही म्हणून, गावच्या मराठा समाजाने त्या मातंग सरपंचाला गावच्या लाईटीच्या खांबाला बांधून अमानूष मारहाण केली. त्याही प्रकरणाला न्याय बौद्धांनीच दिला. अशीच अवस्था चर्मकार समाजाची होती. ते तर आंबेडकरी चळवळीत कधीच सामिल झाले नाही. पण जेंव्हा ' उना प्रकरण ' झाले त्यावेळी बौद्धांनी तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला. आम्हीच का तुमचे मोठे भाऊ म्हणून कायम रस्त्यावर उतरायचे? असा सवाल केला. यातून धडा घेऊन चर्मकार समाज आंबेडकरी चळवळीत सामील झाला. तो आजपर्यंत टिकून आहे. पण उपवर्गीकरणाच्या प्रकरणावरून मातंग नेत्यांनी बौद्धांवर व त्यांच्या बापावर केलेली चिखलफेक पाहून परत कधी बौद्ध समाज लवकर आपला लहान भाऊ म्हणून मातंग समाजाच्या मागे उभा राहिल, हि आशा आता संपुष्ठात येत चाललेली आहे.
तसेच दूसरे असे की, आज मातंग समाजाचे नेते महामानव डॉ आंबेडकरांवरही टीका करायला लागलेले आहेत व तीही प्रसार माध्यमांसमोर उघड उघडपणे. पण मातंग समाजाला व त्यांच्या नेत्यांना एक सांगावेसे वाटते की, जर कधी अण्णाभाऊ साठेंना बौद्ध समाजाने पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले नसते तर, हेच अण्णाभाऊ साहित्यक्षेत्रातच काय , पण महापुरूषांच्या यादितही कुठे सापडले नसते. कारण त्यांनी संपूर्ण हयात कम्युनिस्टांची धूणे धूण्यात व त्यांचीच तळी उचलण्यात घालवली. ते आंबेडकरांच्या बाजूने कधी उभेही राहिले नाही की, कोणत्या लढ्यात सहभागीही झाले नाही. त्यांचे डफडे व त्यांचा आवाज हा फक्त वरच्या आळीतच घुमला. यामुळे वरच्या आळीनेही त्यांचा फक्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी पुरताच उपयोग करून घेतला व काम झाल्यावर त्यांना फेकून दिले. मातंग समाजही त्यांच्या पाठीशी नव्हता. तोपर्यंत अण्णाभाऊ साठे काय चीज आहे हे मातंगानाही माहित नव्हते. उलट त्यांच्या उर्वरित काळात त्यांना बौद्धांनी साथ दिली म्हणून अण्णाभाऊंचे नाव जीवंत राहिले. जे अण्णाभाऊंचे तेच मुक्ता साळवेंचे. मुक्ता साळवेंना प्रकाशात आणले ते बौद्ध समाजाचे व पुण्याच्या सुगावा प्रकाशनाचे मुख्य संपादक असणारे मा. विलास वाघ यांनी आणले. त्यांनीच मुक्ता साळवे यांच्या निबंधाच्या दोन हजार प्रती स्वतः छापून त्या सप्रेम भेट म्हणून मोफत वाटल्या. तर बौद्ध समाजाचे जेष्ठ साहित्यिक दिपक गायकवाडसर यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र देऊन " मुक्ता साळवेंचा निबंध प्रत्येक शाळा, महाविद्यालयात ' अब्राहम लिंकन चे हेडमास्तरास पत्र ' या प्रमाणे लावण्याची सक्ती करावी व तसा अध्यादेस काढावा अशी विनंती केली होती.
थोडक्यात सांगायचे म्हणजे बौद्ध समाजानेच आजपर्यंत सर्वात जास्त मातंग समाजाला आपले धाकटे भाऊ म्हणून सर्वच बाबतीत संरक्षण दिले. पण आज ' कुंपणानेच शेत खाल्ले किंवा झक मारली आणि गाढवाला पाणी पाजले ' असा पश्चात्ताप बौद्धांना होत आहे. तेंव्हा ही आरक्षण उपवर्गीकरणा वरून वाढलेली दरी मातंग बांधवांनीच मिटविणे गरजेचे आहे. नाहीतर उद्या कोणीच कोणाच्या पाठीशी नसेल व यांचा फायदा हिंदूत्ववादी वैरी सहज उठवेल व दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे होईल.यात शंकांचं नाही.







