जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे खंडोबा उत्सव समिती व गावकऱ्यांच्या वतीने खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. २९ आणि ३० ऑगस्ट असे दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक उत्साहामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याची सुरुवात शनिवार २९ ऑगस्ट सकाळी मूर्ती नगर प्रदक्षिणा वास्तुची महापुजा तसेच संध्याकाळी ९ वाजता वाघे मंडळी चे जागरण होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी रविवार सकाळी मूर्ती स्थापना, होम हवन व त्यानंतर महाप्रसाद होईल.तसेच संध्याकाळी संध्याकाळी ९ वाजता आरबडी मंडळाचे जागरण होईल. गावात उभारण्यात आलेल्या या खंडोबा मंदिराच्या खंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आणि धार्मिक कार्यक्रमाचा पंचकोशीतील व गावातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन खंडोबा यात्रा उत्सव समिती व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.




