जालना प्रतिनिधी
प्रदीप जाधव
जालना : दि.२८ ऑगस्ट २०२६ जालना जिल्ह्यातील बाजीउंब्रद येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त बौद्ध उपासिका व उपासकांच्या संयुक्त विद्यमाने भव्य धम्मदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शिलवान, बौद्ध उपासिका व उपासकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहणाने झाली. त्यानंतर भिक्खू संघ व उपस्थित उपासक-उपासिकांना भोजनदान करण्यात आले. दुपारी स्वागत समारंभ, भिक्खू संघाची धम्मदेसना व भोजनदान असे विविध कार्यक्रम पार पडले.
या कार्यक्रमास पु. भिक्खू रेवत तसेच पु. श्रामणेर मंगलाबोधी यांची उपस्थिती लाभली. तसेच मा. आयु.राजेश गायकवाड (अध्यक्ष, बारागांव गट पौर्णिमा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
बारागांव गट पौर्णिमा अंतर्गत धानोरा, मोजपुरी, पारेगाव, निरखेडा, दहिफळ, जळगाव (सो), मानेगाव, बाजीउंब्रद, सावंगी, बर्डी, वखारी व उमरी परिसरातील उपासक-उपासिका आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश देणारा हा धम्मदान कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






