दिपक गायकवाडसर
संपादक निर्भिड आवाज न्युज
दि. २२ ऑगस्ट २०२६ जगात लोकशाही प्रमाणेच अनेक शाही व्यवस्था आहेत. यात प्रामुख्याने लोकशाही व हुकूमशाही या दोनच सत्ता प्रमुख आहेत. लोकशाहीत देशहिताचे व सामाजिक प्रगतीचे हित जास्त असून धोके कमी आहेत.पण याहीपेक्षा हुकूमशाहीत जर हुकूमशहा हा देशभक्तीचा असेल व लहरी नसेल तर ते राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाते. पण जर लहरी हुकूमशहा आपल्या मर्जीने वागला व जनतेच्या जनमताला जूमानले नाही, तर त्या राष्ट्राचा विनाष हा लवकरचा ठरतो. पण आपल्या भारतात लोकशाहीतून हुकूमशाहीचे स्वप्न पहाणारे सरकार स्थापन झाल्यापासून हा देश क्रांतीच्या व दुसऱ्या स्वतंत्र्य युद्धाच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला आहे. चालू भविष्यात भारतीयांना यातील एक मुख्य मार्ग स्विकारून स्वतःलाच स्वतःच्या देशाचे भवितव्य अबाधित राखावे लागेल. नाहीतर हा देश ज्यांना आपण आजपर्यंत आपले म्हणण्याचा व समजण्याचा मूर्खपणा केला, तेच पुरातन परकीय व पहिले अतिक्रमणकारी खैबरखिंडी मार्फत भारतात आलेले आर्यच, भारताचे हुकूमशहा बनतील व मूळभारतीयांना आपले गुलाम बनवून पारतंत्र्यात जगण्यास भाग पाडतील. अशी आज भारतीयांची भविष्यकालीन अवस्था आहे. पण या आर्यवंशीय लोकांना हि इतकी गुर्मी व रग आली कोठून? याचा विचार केला तर त्याचे पहिले उत्तर आर्य हे परकीय आहेत हे माहित असूनही मूळभारतीयांनी त्यांच्या हातात दिलेले धार्मिक पौराहित्याचे स्वातंत्र्य किंवा या परकीयांना दिलेले धार्मिक गुरूचे स्थान हे होय. तर त्याचे दूसरे उत्तर म्हणजे याच धार्मिक गुरूस्थानाचा किंवा पौराहित्याच्या जोरावर या परकीय आर्यांनी आपल्या सोयीने हिंदूत्वाचा वारंवार गजर करून हिंदूधर्मियातच अमानुषतचे, अमानवतेचे व विषमतेचे बीज पेरून त्यांना आपले मानसिक व धार्मिक गुलाम आणि मनोरुग्ण केले. यामुळे देशभक्ती मागे पडून धर्माला सर्वोच्च स्थान पैदा झाले. यामुळे हिंदूत्व, हिंदूधर्म, हिंदुस्थान, हिंदूधर्मराष्ट्र म्हणजेच राष्ट्र भक्ती अशी मानसिकता तयार होण्यास मूळभारतीयांना वेळ लागला नाही. पण हे या परकीय आर्यांना एकदम सुचले का? कि त्यांनी याची कोणाकडून प्रेरणा घेतली, याचा सखोल विचार करावा लागेल. कारण हे काही जादूची कांडी फिरवल्या सारखे अचानक घडलेले नाही तर, हे सारे हिंदूत्वमय आभास निर्माण करण्यासाठी या परकीय आर्यांनाही फार मेहनत घ्यावी लागली. यासाठी त्यांनी प्रथम आपली स्वतःची आर्यवंशीय प्रणीत आरएसएस नावाची संघटना १९२५ ला स्थापन करावी लागली. त्यानतंर त्यांनी आपले आपलेच संघटन बांधून भारतावर स्वातंत्र्यानंतरही राज्य स्थापन करण्याचा चंग बांधला. यासाठी त्यांनी संविधान सभेला व संविधानाला विरोध करून लोकशाही व्यवस्थेलाच नकार दिला. एवढेच नाही तर देशाला मनूस्मृती सारखा कायद्याची संहिता असताना रज्यघटना हवीच कशाला? असा सुरवातीला सुर घोकून पाहिला. यानंतर भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा असावा अशीही मागणी करून पाहिली. पण तिलाही मूर्तरुप आल्याने सरतेशेवटी भारतीय संविधानालाच विरोध करायला सुरुवात केली. पण हा नुसता विरोध करून चालणार नव्हते तर, त्यासाठी काहीतरी कृती कार्यक्रम आखणे गरजेचे होते. कारण ज्या मूळभारतीयांवर आपण इंग्रजांप्रमाणेच परकीय म्हणून हजारोवर्षे राज्य केले. त्यांच्या नाकावर टिच्चून पेशवाईचे राज्य आणले आणि आज त्याच मूळभारतीय गुलामांनी लोकशाहीची स्थापना करून, आपला जनमानसातील देवत्वाचा व वर्णश्रेष्ठत्वाचा हक्क व अधिकार संपुष्टात आणून आपल्याला सामान्य जनतेत सहभागी केले? याचा सूड उगवलाच पाहिजे व तसे फासे टाकलेच पाहिजेत याबाजूने विचार करायला सुरुवात केली. अशा पद्धतीचा विचार करून अशापद्धतीने संपूर्ण देशाची सत्ता हातात घेणारा जगातील कोण व्यक्ती आहे व त्याचा इतिहास काय आहे याचा शोध सुरू झाला आणि या शोधातून त्यांना एक नाव सापडले ते म्हणजे हिटलर. हिटलर हा तसा एका चांभाराचा मुलगा. पण त्याने सैन्यात भरती होऊन सैन्यातच आपला एक गट तयार केला व प्रस्थापित राजवटीच्या विरुद्ध शह द्यायला सुरुवात केली. नतंर त्याने सैन्याची नौकरी सोडून तो एक राजकीय पार्टीचा नेता बनला व त्याने आपल्या पक्षाचे चिन्ह स्वस्तिक बनवले. तसेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याने काळा ड्रेसकोड सक्तीचा केला. सुरवातीला जर्मनीतील राजकीय नेत्यांना दोषी व देशद्रोही ठरवायला सुरवात केली. यानंतर त्यांच्यावर सामुहिक हल्ले करून त्यांना बदनाम करायला सुरुवात केली. यामुळे जर्मनीत त्याची व त्याच्या पक्षाची एक दहशत निर्माण झाली. मग त्याने राजकारणात उडी घेऊन तो सत्तेत आला. सत्तेवर येताच त्याने विरोधी राजकर्त्यांना जेलमध्ये टाकले व कित्येकांचे प्राण घेतले. तसेच त्याने आपल्या पाठीमागे देशाचे जनमत वळवण्यासाठी त्याने ज्यू लोकांना देशाचे दुष्मण व देशद्रोही ठरवूध त्यांच्या हजारोनी कत्तली केल्या. ज्यूंची कत्तल करण्याचा हिटलरचा हेतू दूहेरी होता. ज्यूंची कत्तल करून जनमाणसात देशभक्तीची प्रतिमा उजळ करणे व ज्यूंच्या मृत्यूनतंर त्यांची संपत्ती आपल्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटून भरिव प्रगती होत असल्याचे भासवणे हे होते. नेमका तोच आदर्श समोर ठेवून भारत सरकार काम करत आहे. आरएसएसनेही सुरवातीला स्वस्तिक चिन्ह निवडुन त्याला धार्मिक पुजेत स्थान दिले. धार्मिकतेचा भाग म्हणून हिंदू जनता त्याला वैयक्तिक पूजेत स्थान देऊन घराच्या भिंतीवर, दरवाजावर छापने शुभ मानू लागली. पण हा आरएसएसचा सुरवातीचा जनमत ओळखण्याचा कार्यक्रम होता. त्यात ते यशस्वी झाले. मग त्यांनी दूसरी पायरी म्हणून ज्यू लोकांप्रमाणेच मुस्लिम समाजाला देशद्रोही ठरवायला सुरवात केली. यासाठी त्यांनी गुजरात हि आपल्या प्रयोगाची कार्यशाळा बनवून तेथे २००२ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना २००० मुस्लिमांची सुनियोजित हत्या केली. कारण याच्या बरोबर दहा वर्षे अगोदर म्हणजे ६ डिसेंबर १९९२ला याच आरएसएस प्रणित संघटनांनी बाबरी मशीद उद्धवस्त करून आपली दहशत निर्माण केली होती व मुस्लिम देशद्रोही असल्याचे शिक्कामोर्तब हिंदूत्वाच्याच नावावर केले होते. या आरएसएसने फक्त मुस्लिमांनाच देशद्रोही ठरवले असे नाही तर त्यांनी मुस्लिमां बरोबरच ख्रिस्ती समाजाला देशद्रोही ठरवले व २३ जानेवारी १९९९ च्या रात्री कुष्ठरोगी सेवार्थी ‘ ग्राहम स्टेन ‘ यांना आणि त्यांच्या दोन मुलांना जीवंत जाळून मारले. तर कित्येक नन्सवर बलात्कार केले. मुस्लिम व ख्रिस्ती यांना परधर्मिय म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे सोपे होते. पण दलित, ओबीसी हे तर मूळभारतीय नागरीक होते व त्यातले बरेच हिंदूही होते. तरी ११ जूलै १९९७ ला भाजपचा महाराष्ट्रातील राज्यसरकारचा शिवसेना हा सत्तेतील मित्रपक्ष असतानाच त्याने स्वतः डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करून उफाळलेल्या जनमोर्चावर गोळीबार करून अकरा जनांचीच हत्या केली. तर २९ सप्टेंबर २००६ ला खैरलांजी हत्याकांड काँग्रेसच्या काळात याच आरएसएस च्या हिंदुत्वाच्या मानसिकतेतूनच घडले. तर व्ही.पी सिंग सरकारने ओबीसींसाठी मंडल आयोगा नुसार संविधानिक मार्गाने प्रगती करायचे ठरवताच व आय.आय.टी,आय.आय.एम.या सारखे उच्च शिक्षण घेता यावे म्हणून मंडल आयोग मंजूर करण्याचे धोरण स्विकारताच आरएसएस ने लगेच त्यात खोडा घालायचे ठरवले व त्याला रस्त्यावर उतरून तिव्र विरोध केला. तर कित्येक ठिकाणी जाळपोळ केली. एवढेच नाही तर ओबीसीचे मन मंडल आयोगावरून उठवून धार्मिकतेत गुंवण्यासाठी कंमडलू रथयात्रा आडवाणीच्या मदतीने काढली. एवढेच नाहीतर अटलबिहारी वाजपेयी यांनी ” धर्मयुग ” ला प्रत्यक्ष मुलाखत देवून सांगितले की, ” उन्होने मंडल निकाला, इसलिए हमने कमंडल निकाला ” असे जाहीर सांगितले. हि सर्व प्रकरणे आरएसएस ने हिंदूत्वाची मानसिकता भारतीय जनमानसांच्या मनात पेरल्यानेच झाली. याला सर्वस्वी जबाबदार आरएसएसच आहे. त्यांना परकीय म्हणून इंग्रजांप्रमाणे भारतीयांवर ‘ फोडा,झोडा व राज्य करा ‘ या तत्वाने राज्य करायचे आहे. हे जसे सत्य आहे तसेच हेही सत्यच आहे की, त्यांना हिटलर प्रमाणेच दहशत निर्माण करूनमूळभारतीयांवर राज्य करायचे आहे. कारण त्यांना त्यांच्या द्वीतीय सरसंघचालकाने की ज्याला ते आपला देव मानतात, त्या गोळवलकरनेच सांगून ठेवलेले आहे की, ” संघ हिंदू राष्ट्राचा प्रतिनिधी स्वरूपच नाही तर तो हिंदूराष्ट्राचे स्वरूप म्हणून आपल्यासमोर आहे. म्हणून हि भारताची संपूर्ण भूमी राष्ट्ररूपी संघाची व्हावी. ” ( संदर्भ :- श्री गुरूजी समग्र दर्शन भाग १, २ मार्च १९८१ आवृत्ती) म्हणूनच ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेपूर्वी ‘ धर्म संसद ही देशाच्या संसदेपेक्षा श्रेष्ठ आहे. ‘ अशी भूमिका सर्व आरएसएस प्रणित संघटनांनी घेतली होती. एवढेच नाही तर गोळवलकरानी १९३९ मध्येच ‘ हिंदूत्व हेच राष्ट्रियत्व ‘ हा गुरुमंत्र संघासमोर ठेवून सांगितले होते की, ” या देशात हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने हिंदूस्थान, हिंदूवंशासहित हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू भाषा संस्कृत हि पाच अंगे राष्ट्र या संकल्पनेची परिपूर्तता करतात. या पुरस्कारित हिंदूस्थानात प्राचीन हिंदू राष्ट्राचे अस्तित्व रहाणे अनिवार्य आहे. ” ( संदर्भ :- एन. जी. कांबळे, अशोक विजयादशमी धम्मचक्रप्रवर्तन दिन, पृ. ७१/७२) या हिंदू राष्ट्राची अवहेलना करून जर मुस्लिम लोक येथे राहिलेच तर त्यावर उपाय सुचवताना गोळवलकर म्हणतात ” जर्मनीने आपल्या वंशाचे आणि संस्कृतीचे शुद्धत्व अबाधित टिकविण्यासाठी देशाचे शत्रू लोकांचे शिरकाण करून जगाला हबकून टाकले. ही त्यांच्या वंशीय अभीमानाची सर्वोच्च पातळी होय. जर्मनीने हेही दाखवून दिले की वंश आणि संस्कृती यातील मूलभूत भेदामुळे एकरूपरित्या संघटित होणे अशक्य आहे. आम्हा हिंदुस्थानच्या लोकांना शिकण्यासारखा आणि आमच्या हिताचा हाच धडा योग्य धडा आहे. ” ( संदर्भ :- एन.जी.कांबळे, पुणे करार उज्वल भविष्याचा प्रारंभ,पृ. ११० ) या तत्वाला अनुसरून आरएसएस ने हिंदुत्वाच्या आड येणाऱ्या म. गांधीचा खून केला, तर लोकशाहीची भारतात स्थापना करणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जेवनात विष घालून जीवेमारण्याचा कट रचला होता. या कटात विनायक सावरकराचे थोरले बंधू बाबा सावरकर की ज्यांना थोरली पाती म्हटले जाते यांचा प्रमुख सहभाग होता. पण नाशिकच्या कुर्तकोटी शंकराचार्याने वेळेवर जेवनासाठी लागणारे पाचशे रुपये न दिल्याने हा कट फसला. हिच हिंदुत्वाच्या आड येणारी मृत्यू श्रृखंला आजही चालू आहे. यामुळेच दाभोळकर, पाणसरे, लंकेश व न्या. लोह्या यांना आपले प्राण द्यावे लागले. पण या हिंदूत्वाचा धोका डॉ आंबेडकरांनी वेळीच आगोदर देवून ठेवला होता. ते म्हणाले होते ” हिंदुत्व हे एक राजकीय कल्पनाशास्त्र आहे आणि ते पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे. जे हिंदुत्वाच्या कक्षेबाहेर आहेत किंवा हिंदूत्वाला विरोध करतात या सर्वांच्या – मुस्लिम, दलित, बहुजन समाज,लोकशाहीवादी -भरभराटीला तो उघड धोका आहे. ” हा महामानवाचा संदेश ओळखूनच आजच्या बहुजन तरूण तरूणींनी आपली आयुष्याची रणनीती ठरवावी व देशाला परकियांच्या तावडीतून सोडवून देशाला प्रगतीपथावर न्यावे. हिच एक प्रांजळ अपेक्षा.






