पुणे प्रतिनिधी
पुणे : दि. २५ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह येथे आंदोलन तब्बल १३ दिवसांपासून सुरू आहे.
या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत. आज वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून पूर्वीच आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा देण्यात आला होता. आज सुजात आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, असे स्पष्ट केले.
शासन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत नसून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाने गांभीर्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.






