जालना प्रतिनिधी
रामकिशन अवधूत
जालना : दि.२२ ऑगस्ट २०२६ शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृति दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा प्रसंगी अंधश्रद्धा , अज्ञान आणि अन्याया विरूद्ध आयुष्यभर लढणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार वैज्ञानिक विवेकवादी दृष्टिकोन व जिवन कार्यास मान्यवरांनी आपले विचार मांडून उजाळा दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांनी बोलतांना सांगितले की, विचार मरत नाहीत..ते पिढ्यानपिढ्या लढण्याची ताकद देतात… डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची स्मृति कायमच पिढ्यानपिढ्या आठवणीत राहतील असे प्रतिपादन यावेळी केले यावेळी भंते रेवत, राजेंद्र खरात एम.व्ही चौधरी, गाडगे श्रीराम उघडे, सुकदेव बोर्डे, विलास दाभाडे, प्रशांत खंडागळे,किरण कोळी, लताबाई रनविर,मालताबाई बोर्डे,नंदा साळवे बनकर,भोरजार, चंद्रकलाबाई बनकर,पंचशीला पारधे, कांताबाई म्हस्के,रंजना गाडगे,सिमा सदावर्ते, अलका डोके, अस्मिता डोके, शारदा कोळे यांच्या सह मोठ्या संख्येने फुले शाहू आंबेडकरवादी नागरिक उपस्थित होते.







