ठाणे प्रतिनिधी
प्रदिप जाधव
मुंबई: दि. १८ ऑगस्ट २०२६ मा.रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली. यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बुद्धभूमी फाउंडेशन बाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत खालील विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील जमिनीबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने T.D.R. काढून सातबारा उताऱ्यावर केलेल्या नोंदींची सुनावणी घेऊन सदर नोंदी रद्द करणे तसेच दोषी अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत. सातबारा उतारा बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावावर करण्याबाबत चर्चा झाली.
बुद्धभूमी फाउंडेशनच्या भंतेगण व साधकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले अन्यायकारक FIR रद्द करण्याबाबत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वालधुनी नदी समांतर नियोजित उन्नत मार्गास “तथागत भगवान गौतम बुद्ध उड्डाणपूल” नामकरण तसेच बुद्धभूमी परिसराच्या संरक्षणासाठी “बुद्धभूमी धम्मगेट” उभारण्याबाबत.
वरील बैठकीला कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रांत अधिकारी कल्याण विभाग, तहसीलदार कल्याण, कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी, mmrda अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






