कल्याण प्रतिनिधी
प्रदीप जाधव
ठाणे : दि. २२ ऑगस्ट २०२६ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेवर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आंदोलनातील भाषणात म्हणाले की, उल्हासनगर महानगरपालिकेने ज्या ३१ घरांना आणि मशिदीला कारवाईची नोटीस दिली आहे, त्या नोटिसा मागे घेऊन कारवाई तत्काळ थांबवावी.
उल्हासनगरमधील सर्व घरे नियमित करावीत. त्या नागरिकांना घरपट्टी, पाणी बिल, वीज बिल यांसारखी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन प्रत्येक घर त्यांच्या नावावर करण्याचे काम सरकारने तातडीने करावे.
उल्हासनगरमध्ये हिंदूंचे मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, पारशी समाजाचे फायर टेंपल किंवा बौद्धांचे बुद्ध विहार असो, उल्हासनगरमध्ये असलेल्या कोणत्याही जुन्या धार्मिक स्थळाला स्पेशल विंडोअंतर्गत नियमित करण्याचा दर्जा देण्यात यावा आणि कोणत्याही धार्मिक स्थळाला हात लावू नये, ही वंचित बहुजन आघाडीची सरकारकडे मागणी आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकरयांनी सरकारकडे मागणी केली.
कारवाई तात्काळ थांबवावी आणि नोटिसा मागे घेऊन घरांना नियमित करावे, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष मनोज पवार, जिल्हा प्रवक्ते सोनू पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उल्हासनगरचे नागरिक उपस्थित होते.







