सैनिक बाबुराव विणकर यांची निवड
देश सेवेसोबत समाजसेवेचा वसा गरजूंसाठी वर्ष भर कार्य ,
एका सैनिकाचा प्रेरणादायी प्रवास
सिंदखेड राजा
प्रतिनिधी
सिंदखेडराजा : दि. २५ ऑगस्ट २०२६ अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत शिक्षण, पत्रकारिता, भारतीय सैन्यसेवा आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे सैनिक. बाबुराव भगवान विणकर हे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादाई ठरत आहेत. देशसेवेचे कर्तव्य बजावत असतानाच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
बाबुराव विणकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून संभाजीनगर येथील मिलिंद कला महाविद्यालय मध्ये शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात भरती झाले अणि ड्यूटी सोबत पुढील शिक्षण सुरू आहे
“माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि त्याने आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे,”
या विचाराला त्यांनी आपल्या जीवनातून प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे.
‘एक गाव, एक समाज’चा यशस्वी प्रयोग
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश डोळ्यासमोर ठेवून ते आजही आपल्या सुट्टीच्या काळात सामाजिक कार्यासाठी वेळ देतात.
अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि रक्तदानासाठी पुढाकार
जादूटोणा, करणी, अंगात येणे यांसारख्या गैरसमजांविरोधात जनजागृती करण्याचे काम ते करतात. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम सांगत व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमांना मदत अशा विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत स्पर्धा परीक्षा, सैन्य भरती आणि विविध सरकारी नोकऱ्यांच्या तयारीसाठी ते मार्गदर्शन करतात.
महाराष्ट्रातील विविध अकॅडमीमध्ये ते अनेकदा मोफत मार्गदर्शन करत असतात
राज्य आणि देशभरातून विविध क्षेत्रातून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.
कमाईतील काही हिस्सा गरजूंसाठी देणे
समाजाचे आपण काही देणे लागतो,ही भावना जपतात विविध पुरस्कारांनी सन्मान नवी दिल्ली येथे ग्लोबल ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरमच्या माध्यमातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड’ 2025
तसेच ‘चक्रवर्ती सम्राट राजा अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ 2026 आणि कोल्हापूर येथील कलामंच संस्थेतर्फे ‘संविधान गौरव’ सन्मानासाठी त्यांची निवड झाली आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमांसाठी त्यांना तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून प्रशस्तीपत्र मिळाले
सीमेवर देशसेवा; कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य वीज, मोबाईल नेटवर्क आणि वाहतुकीच्या मर्यादित सुविधा असतानाही कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी ते निष्ठेने पार पाडत आहेत.
‘देशसेवा आणि समाजसेवा हीच खरी जीवनाची कमाई’
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असतानाच सुट्टीच्या काळात गावाकडे परतून समाजासाठी वेळ देणारा हा सैनिक आजच्या तरुणांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहे
त्यांच्या कार्यातून “शिका, संघटित व्हा आणि समाजासाठी काम करा” हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
“देशसेवा ही माझी जबाबदारी आहे आणि समाजसेवा ही माझी सामाजिक बांधिलकी आहे. माझ्या उत्पन्नाचा आणि वेळेचा काही भाग समाजासाठी देणे, हीच माझ्या जीवनाची खरी कमाई आहे,” असा त्यांचा प्रेरणादायी संदेश आहे.
वरील बाबींचा विचार करून निवड समितीने दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंदारे यांच्या स्मृतिपीत्यर्थ देण्यात येणारा राष्ट्र संत गाडगेबाबा समजरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2026 त्यांना जाहीर केला आहे या कार्याबद्दल सर्वच स्तरातून सैनिकाचे कौतुक होत आहे ..जय जवान .जय किसान






