कल्याण : दि. २४ जुलै २०२६ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
जंतर-मंतर येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.पोलिसांनी आंदोलकांना पकडून गाडी मध्ये जबरदस्ततीने बसविले व वातावरण चिघळले.आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जळला व निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र बंददरम्यान राज्यातील विविध भागांप्रमाणेच कल्याणमध्येही विविध संघटनांनी निषेध आंदोलने केली. जंतर-मंतर प्रकरणाच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन झाल्याची माहिती समोर आली आहे.





