अहिल्यानगर प्रतिनिधी
दिपक गायकवाड
अहिल्यानगर : दि. २४ जुलै २०२६ अकोले तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या गलथान व हुकूमशाही प्रवृत्तीच्या मानसीक विकृती विरोधात व जंतरमंतर मैदानावर सनदशीर मार्गाने उपोषण करून, आपला न्याय्यहक्क बजावणा-या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करून मारहाण करणाऱ्या सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. याला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ॲकॅडमीचे विद्यार्थी, अगस्ती काॅलेजचे विऊद्यार्थी व जागृत सामान्य जनता यांनी सहभाग घेतला. या केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या त्यांच्या हाकेला प्रतिसाद म्हणू या बंदचे नियोजन सर्व समविचारी पक्षांकडून करण्यात आले होते . यावेळी काॅ. अजित नवले, विनय सावंत, वंचितचे तालुका सरचिटणीस रवी पवार, आरपीआयचे शांताराम संगारे यांनी आपले मनोगत मांडले. यानंतर अकोले तालुका वंचितचे अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी आपले मनोगत मांडून, वेळ पडल्यास विद्यार्थीच काय पण पुढच्या वेळेस विद्यार्थ्यांचे पालकही या आंदोलनात जंतरमंतर मैदानावर सामिल होतील आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला अंगावरच काय पण शिंगावर घ्यायलाही मागे हटणार नाही असे जाहीर केले . या आंदोलनात जीवनगौरव पुरस्कार विजेते किशोर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाळू पराड हे व यासारखे असंख्य कार्यकर्ते सामिल झाले होते. सरतेशेवटी अकोले तालुक्याचे तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन स्विकारले व मोर्चाची सांगता झाली.




