मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दि. १४ जुलै २०२६ महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण योजने’तून ९० लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळण्यातआली आहेत. ई-के वासी प्रक्रियेनंतर सुमारे ८० लाख नावे वगळण्यात येत असल्याचेसरकारच्या वतीने एक महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले होते ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता ९२ लाखांवर गेली आहे. मूळ लाभार्थी संख्या २.४ कोटी होती, त्या
तुलनेत ही घट सुमारे ३८ टक्के आहे. केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही घट झालेली नाही तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे ५० ते ५५
लाख महिला मुदतीत ई-के वायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. तर १२ लाख महिलांचे वार्षिक कौटुबिंक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते आणि ४.५ लाखांहून अधिक महिलांचे वय ६५ वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होते. याशिवाय सुमारे १४ हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आले. सर्वाधिक महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,
सरकारने लाभार्थ्यांना ई-के वायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे आठ महिन्यांचा कालावधी दिला होता. या काळात अनेक महिलांना ती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही, परिणामी सुमारे ५५ लाख नावे वगळली गेली. सुमारे १२ लाख महिला या प्राप्तीकर भरणाऱ्या आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त
असल्याचे आढळून आले. सुमारे ५ लाख महिला आधीच ‘नमो शेतकरी योजने’अंतर्गत लाभ घेत होत्या.अंतिम लाभार्थी संख्या ही फेरपडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित केली जाईल. असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या लाभार्थ्यांना आपली नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्याचे वाटते, त्यांच्या तक्रारींचीही चौकशी केली जात आहे.





