बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या आणि रखडलेल्या कामाची चाचणी घेण्याकरीता केंद्र शासनाचे पथक बीड जिल्ह्यात दाखल. दाखल होताच बीड जिल्ह्यातील अनेक महामार्गाच्या कामाची तपासणी करत नमुने जमा करण्यास सुरुवात. निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का ? असा सवाल बीड जिल्ह्यातील जनता करत आहे.




