सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर : दि.१२ जूलै २०२६ जालना जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात १६ ऑगस्ट १९४१ या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सिन्नर जि. नाशिक येथे येऊन त्यांनी, इंग्रज सरकारच्या विरोधात ‘ जादा जुडी ‘ प्रकरणाचे रणशिंग संपूर्ण भारतातील अस्पृश्य महार समाजाच्या इनामी जमीन असणा-या हाडकी – हाडवळा यावर सरकारी कर घेण्याच्या निर्णयाविरुद्ध फुंकले होते. याविरोधात त्यांनी सिन्नर येथे भव्य परिषद घेऊन इंग्रज सरकारला असे ठणकावून सांगितले होते की, ‘ जर इंग्रज सरकारला महार वतनी जमीनीवर शेतसारा घ्यायचाच असेल तर सरकारने ‘ वर्षभर गावकीची कामे फुकटात करणा-या महारास महिन १० रुपये पगार द्यावा, अन्यथा हा कायदा मागे घ्यावा ‘ असा इशारा दिला होता. या घोषणेने इंग्रज सरकार नरमले व त्याने महार इनामी जमीनीवर शेतसारा घेण्याचे धोरण व कायदा मागे घेतला. या न्यायाची आठवण म्हणून सिन्नर येथील तमाम सुज्ञ आंबेडकर प्रेमींनी व बुद्धीवंतांनी एकत्र येऊन हा दिवस ‘ पदस्पर्श सोहळा ‘ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. हे त्याचे दूसरे वर्ष असून त्याच्या नियोजनाची बैठक आज खेळीमेळीच्या वातावरणात मा.नगरसेवक आर.एन.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला निर्भीड आवाज न्युज चॅनलचे संपादक मा. दिपक गायकवाडसर, माजी नगरसेवक व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा. प्रभाकर जाधव, माजी नगरसेवक मा. श्रीकांत जाधव, जेष्ठ समाजसेवक मा. मधुकर जाधव, जेष्ठ उद्योजक मा. रावसाहेब आढाव, जेष्ठ बौद्धाचार्य मा. बाबासाहेब आव्हाड, मा. हरेश जाधव, मा.पोपट जाधव, मा. राधू साळवे हि सर्व जेष्ठ कार्यकर्ते मंडळी हजर होती. यावेळी पहिल्याच बैठकीत ९००० रूपये दान स्वरूपात मिळाले. यानंतर पुढील बैठक सिन्नर येथेच संपूर्ण तालुक्याच्या वतीने शनिवार दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्याचे ठिक २:०० वा. निश्चित करण्यात आले. तसेच या बैठकीला सिन्नर तालुक्यातील तमाम आंबेडकरी प्रेमींनी व जनतेने हजर रहावे असे अध्यक्षांच्या वतीने आवाहनही करण्यात आले.




