जालना प्रतिनिधी
रामकिसन अवधूत
. जालना : दि. १२ जुलै २०२६ जालना तालुक्यातील सेवली ला शासनाने अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीतून डावलल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. दिनाक १४ जुलै२०२६ रोजी सेवली येथे जिल्हा प्रशासन व स्थानिक आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केले आहे.





