परळी वैजनाथ
प्रतिनिधी
परळी वैजनाथ : दि. ३ जुलै २०२६ रोजी कार्यकर्ता शिबीराच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौध्द महासभेची परळी वैजनाथ तालुका कार्यालयात बैठक पार पडली.
परळी वैजनाथ येथील भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दि. ५ जूलै २०२६ रोजी होणाऱ्या कार्यकर्ता शिबीराच्या पार्श्वभूमीवर आज रोजी भारतीय बौध्द महासभेच्या परळी वैजनाथ येथील तालुका कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत दि. ५ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या कार्यकर्ता शिबीराचे आयोजन आणि नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर परळी वैजनाथ तालुक्याचे अध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे यांनी सर्व पदाधिकारी यांना कार्यकर्ता शिबीरा बद्दल सुचेना व मार्गदर्शन केले. यावेळी या बैठकीस भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका अध्यक्ष आयु. हनुमंत वाघमारे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ शहराध्यक्ष आयु. महादू सरवदे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका सरचिटणीस आयु. यशपाल बचाटे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ पचार व प्रसार आयु. जयपाल पाचांगे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका संघटक आयु. भीमराव मुजमुले, भारतीय बौध्द महासभा तालुका कार्यालयीन सचिव आयु. अभिमन्यु घोबाळे, भारतीय बौध्द महासभा परळी वैजनाथ तालुका संरक्षण उपाध्यक्ष आयु. सिध्दोधन घाटे यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




