
उल्हासनगर : दि. २४ जून २०२६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम लोकप्रिय खासदार मा. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या उपक्रमात परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. शिक्षणाला बळ आणि विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमासाठी नगरसेवक मा.अरुण लक्ष्मण आशान यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच सौ. इंदिरा निखिल पाटील, सौ. संगीता नितीन सपकाळे,काजल अमर जाग्याशी आणि समाजसेवक निखिल पाटील इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.






