परळी /प्रतिनिधी
परळी वैजनाथ: दि. २३ जून २०२६ परळी वैजनाथ शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला एक युवक मंगळवारी सकाळी बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून सुमित कलशेट्टी वय 37, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कलशेट्टी हे आज सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते तलावाच्या अधिक खोल भागात गेले. त्यानंतर ते पुन्हा बाहेर न आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून शोधकार्य सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परळी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






