डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली : दि. २२ जून २०२६ डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन (शासन मान्य संस्था) आणि दुर्वा एज्युकेशन समुपदेशन व प्रशिक्षण केद्र डोंबिवली – मुंबई मार्फत सहा महिन्याचा बना सर्टिफाईट योग शिक्षक ऑनलाईन कोर्स यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा योग शिक्षक प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक २१ जून २०२६ रोजी अंतरराष्ट्रीय योग दिनाचे अवचित साधून संव्यास हॉल डोंबिवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याची सुरुवात डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ (अध्यक्ष) सौ. योगिता राकेश सकपाळ (योग वर्ग शिक्षिका) सौ. कीर्ती द्रविड (योग वर्ग शिक्षिका) यांनी दीप प्रज्वलन करून केली. त्यानंतर मान्यवरांकडून सोहळ्यात सहभागी सर्व विद्यार्थ्याचे स्वागत व कौतुक करण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण काळातील अनुभव व्यक्त करत योगामुळे जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली.
या कार्यक्रमात योग शिक्षक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले, सोबत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला संस्थेमार्फत भेटवस्तू देण्यात आली व पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी मुंबई, सातारा, सांगली कोल्हापूर अश्या महाराष्टातील विविध ठिकाणाहुन विद्यार्थी सहकुटुंब आले होते. तसेच एक विद्यार्थी निपाणी, कर्नाटका येथून देखील सहकुटुंब या सोहळ्यासाठी आले होते. या सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सहकारी नीलम परब, ज्ञानी गुरव, श्रावणी सकपाळ यांनी यशस्वीरित्या केले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले. योग शिक्षक प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामुळे नव्या योग शिक्षकांना समाजसेवा आणि आरोग्य जनजागृतीसाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.





