
अकोले प्रतिनिधी
अकोले : ( निर्भीड न्युज,दिपक गायकवाड) अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ब्रम्हणवाडे या गावात ‘ माझ्या शेतावर कामाला का आली नाही ‘ म्हणून आदिवासी महिलेस ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून त्या गावच्या ग्रामपंचायतीचा उपसरपंच असणाऱ्या सुभाष गायकर या मनुवादी वृत्तीच्या इसमाने बेदम मारहान केली. या मारहाणीचे वृत्त गावभर परताच गावातील आदिवासी व वंचितचे कार्यकर्ते ग्रामपंचायत समोर गोळा झाले व त्यांनी उपसपंच सुभाष गायकर याच्या या अघोरी कृत्याचा निषेध केला. हे वृत्त स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी मोबाईलवरून तालुक्यातील आदिवासी नेत्यांना कळवताच सर्वच आदिवासी संघटना जाग्या झाल्या व त्यांनी अठरा जून या तारखेला अकोले पोलीस स्टेशन वरती निशेध मोर्चाचा नारा दिला. यात आपल्या ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडी सामिल होणार असून, या मनुवादी मानसिकतेच्या उपसरपंचावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करणार आहेत. या मोर्चात आदिवासी संघटनांसह वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दिपक गायकवाड हे मैदानात उतरणार असून, इतरही सामाजिक संघटनांनी या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.





