परभणी प्रतिनिधी
परभणी : दि. १८ जून २०२६ परभणी येथे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ जून २०२६ रोजी अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणा विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणावरील संविधानिक हक्कांचे संरक्षण आणि उपवर्गीकरणाच्या विरोधातील भूमिका ठामपणे मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी या धडक मोर्चात विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक न्याय, समता आणि आरक्षण बचावाच्या लढ्यात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आरक्षण वाचवण्यासाठी, संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा संकल्प या धडक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.






