परळी वैजनाथ प्रतिनिधी
दि. १ जून २०२६ परळी ते घाटनांदूर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर लेंडेवाडी ता. परळी वैजनाथ शिवारात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून. सदरील मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, या मृतदेहाची ओळख पटवण्याकरीता परळी वैजनाथ शहर आणि अपघाग्रस्त परिसरातील नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेंडेवाडी शिवारातील रेल्वे ट्रॅकवर एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांकडून परळी ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे असून
मृताच्या अंगात चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा चेक्स शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, आकाशी रंगाची डिक्सी स्कॉट कंपनीची अंडरवेअर असून, खिशात लाल चेक्स असलेला रुमाल आहे. तसेच पायात लेस नसलेले (विदाऊट लेस) हिरव्या-पांढऱ्या रंगाचे बूट आहेत.
या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास किंवा ओळख पटल्यास त्यांनी तातडीने परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.ए.सय्यद (मो.क्र. 8793931595) किंवा सपोनि सदानंद मेंडके (मो.क्र. 7447554607) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे.






