परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ : दि. १२ जून २०२६ परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी गावात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईदरम्यान ९,७७,३२० रुपये किमतीचा २० किलो ३४० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी शेख बाबूलाल अत्तार आणि वसीम बाबूलाल अत्तार (दोघेही रहिवासी धर्मापुरी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड यांना मिळालेल्या विश्वसनीय व गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) धनराज जरवाल, API मेंडके (परळी ग्रामीण), महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी श्रीमती पल्लेवाड आणि तलाठी यासेर शेख यांच्या उपस्थितीत बाबूलाल अत्तार यांच्या निवासस्थानी अचानक धाड टाकण्यात आली. झडतीदरम्यान पोलिसांना गांजा आणि तो मोजण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आढळून आला; त्यानंतर पोलिसांनी ते पोलिसांनी जप्त केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अमली पदार्थांविरुद्धचे हे मोठे यश प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य करण्यात आले. एलसीबी आणि परळी ग्रामीण पोलिसांच्या पथकांनी अत्यंत सतर्कतेने ही संयुक्त मोहीम राबवली. या परिसरातील या बेकायदेशीर नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे.




