केज/ प्रतिनिधी
केज : दि. १८ आक्टोबर २०२६ सविस्तर वृत्त असे की केज तालुक्यातील मौजे नाहोली येथील मा शरदचंद्रजी पवार गट किसान सेल चे बीड जिल्हा अध्यक्ष सी बी एस इनामदार यांनी आज शासनाने दुष्काळावर केलेल्या उपाय योजने वर जाहीर निषेध केला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिवाळी पाच हजाराचे मदत जाहीर केलेली आहे या 5000 मध्ये शेतकऱ्याला किती पत परवडेल किंवा ज्यांचा हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना केलेली आहे आज पर्यंत गेली एक महिन्यापासून शेतकरी राजा पावसाची वाट पाहतोय पाऊस कुठेतरी पडतोय तुला ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे शासकीय उपाययोजना कागदोपत्रीच आहेत बोर आधी ग्रहण पाण्याचे टँकर अद्याप कुठल्याही गावांमध्ये प्रोसीजरली किंवा प्रत्यक्ष झालेलं नाही शासनाने 20000 प्रमाणे 2019 ला निर्णय दिला होता त्याच नियमाप्रमाणे आताही मदत देणे गरजेचे आहे जनावरांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत खाद्य आणि पाणी या दोन्हीची सोय शासनाने छावणीच्या स्वरूपात किंवा चारा डेपो या ठिकाणी उपलब्ध करून पशुधन वाचवावे तसेच लाडकी बहिणी योजनेची लाखो लाभार्थी केवायसी वाचून वंचित आहेत लाडक्या बहिणीचा हप्ता मिळण्यासाठी केवायसी करावी लागत असल्याने केवायसी च पोर्टल सुरू नाही शासनाने ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविका यांच्याकडे फॉर्म भरण्याचं कार्य दिलं होतं तसं प्रत्येक गावोगावी लाडक्या बहिणींना केवायसी चा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून प्रत्येक गावागावातला खेड्या वस्तीतला लाभार्थी वंचित राहणार नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचे काम केलेल आहे पण प्रत्यक्षात मात्र आज या क्षणाला मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे जीवना उपयोगी असणार अन्नपाणी निवारा मुख्या जनावरांचा चारापाणी त्यांना वेळेवर मिळणं गरजेच आहे आपण केलेल्या या तुटपुंज्या उपायोजनेवर माननीय शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे बीड जिल्हाध्यक्ष सीबीएस इनामदार उर्फ चांद साहेब यांनी जाहीर निषेध केला आहे. प्रत्यक्ष नाहोली गावचा मी रहिवाशी आहे माझ्या गावामध्ये अजून शासकीय बोर अधिकरण झालेले नाही किंवा पाण्याचे टँकर आलेलं नाही जनावरांचा चारा डेपो किंवा छावणीचा प्रश्न ऐरणीवर आहे तो मिटलेला नाही पर्यायी व्यवस्थेसाठी आमची कळकळीची विनंती आपणाकडे आहे तात्काळ चारा डेपो किंवा छावणीचा प्रस्ताव टाकून या ठिकाणचा असणारा पशुधन वाचवण्याचा संकल्प मनात घ्यावा आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हिताचा उपक्रम त्या ठिकाणी राबवावा सध्या पदवीधरण पदवीधर आमदारांचा मतदानाचा विषय चालू आहे येत्या 23 ऑक्टोबरला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा मतदान आहे या मतदानामध्ये सुशिक्षित बेरोजगाराचं काम करणारा एकही आमदार नाही जेणेकरून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम त्या ठिकाणी दिल असा एकही नेता नाही म्हणून या मतदानावर सुशिक्षित बेरोजगारांनि किंवा पदवीधर ने बहिष्कार टाकावा असे आवाहन सीबीएस इनामदार यांनी केले आहे.







