परळी वैजनाथ
प्रतिनिधी
दि.१८ ऑगस्ट २०२६ रोजी परळी वैजनाथ तालुका शाखा संस्था कार्यालयात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. हणमंतराव वाघमारे यांचेअध्यक्षते खाली भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचे प्रतीमा विचार पुजा होऊन संपूर्ण बुद्ध वंदना घेण्यात आली औपचारिक स्वागता नंतर आयु.घाटे सरांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले . भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बीड पुर्व चे हिशोब तपासनीस आयु माधव यादवराव काळे यांनी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य
या विषयावर विचार व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या संकल्पनेतून आगोदर राजकिय स्वातंत्र्या पेक्षा सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचे होते.समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय या सुश्राव्य असलेले स्वातंत्र्यच भारत देशाला महासत्तेकडे नेऊ शकते अन्यथा केवळ राजकीय स्वातंत्र्य हे हूकुमशाही कडे जाईल असे प्रतिपादन करुन ,वज्जि चे लोकशाही राज्य ,भिक्खु संघातील लोकशाही व्यवस्था , चक्रवर्ती सम्राट राजा अशोक ची लोकशाही व्यवस्था,भीषणता स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय या वर आधारित होते म्हणून ते चिरंतर व आज ही स्मरणात राहीले 15 आगस्ट 1947 ते 2026 या कालावधीत सोयीनुसार भारतीय राज्यघटनेत झालेले बदल आणि भारतीय जनतेची जबाबदारी यावर विचार व्यक्त केले .भारतीय बौद्ध महासभेसी पदाधिकाऱ्यांनी प्रमाणीक राहूण धम्म प्रचार प्रसाराचे काम करत संस्थेचे कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष व ता. परळी चे अध्यक्ष आद.हणमंतराव वाघमारे यांनी समारोपाच्या भाषणात पदाधिकाऱ्याची कर्तव्य या वर विचार व्यक्त केले
संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या.सरचिटणीस आयु.यशपाल बटाटे यांनी आदर्शवत शब्दात करुन मंगल वातावरण तयार केले . सर्वांचे आभार मानले व सरणंतय होउन कार्यक्रमाची सांगता झाली






