
कल्याण प्रतिनिधी :प्रदीप जाधव
कल्याण : दि. २० जून २०२६ कल्याण बुद्ध भूमी फाऊंडेशन आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून स्थानिक प्रशासन या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे मत आंदोलनकर्ते आणि समाजातून येत आहे.
कल्याण बुद्ध भूमी फाऊंडेशन येथे झालेल्या घटनेच्या विरोधात सर्व बौध्द बांधव तथा येथील भिक्खू संघ यांनी वालधुनी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पूज्य भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले आहेत.
आंदोलनाच्या माध्यमातून विविध सामाजिक व स्थानिक मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असला तरी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पूज्य भन्ते गौतम रत्न महाथेरो यांनी सांगितले की, जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. भीम अनुयायी देखील आपल्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच दिवस उलटूनही प्रशासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





