
परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ : दि. १७ जून २०२६ परळी वैजनाथ शहरातील फळ विक्रेते आणि फास्ट पुड विक्रेते परळी वैजनाथ शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या आयुष्याशी खेळणे बंद करा असे मत परळी वैजनाथ शहरातील नागरीकांमधून येत आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी महाराष्ट्रातील अनेक भागात भेसळ माफीयांवर कारवाई करत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे भेसळयुक्त उद्योग व्यवसाय बंद केले असून या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता भेसळ माफीया पासून मुक्त होत आहे. ज्या पध्दतीने इतर जिल्ह्यातील शहर ग्रामीण भागातील भेसळयुक्त धंदे तुकाराम मुंढे साहेबांनी बंद केले तसेच एकदा परळी वैजनाथ शहरातील फळ विक्रेते आणि फास्ट फूड विक्रेते यांच्यावर कारवाई करावी असे मत परळी वैजनाथ येथील नागरिकांतून येत आहे. परळी वैजनाथ शहरातील फळ विक्रेते बाजारामध्ये विविध प्रकारची फळे फ्रिजर, केमिकल आणि इंजेक्शन देऊन विकताना दिसत आहेत. परळी वैजनाथ शहरातून खरेदी केलेली केळी आंबे यासारखी काही फळे अशी आहेत की सकाळी घेतली तर संध्याकाळी खराब होतात आणि संध्याकाळी घेतली तर सकाळी खराब होत लहान बालकांना सदृढ करण्यासाठी पालक आपल्या मुलांना फळे चारतात पण हिचं फळे आज लहान मुलांना विषबाधा करत आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून फास्ट फूड वाल्यांना कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड वर्तमानपत्राच्या रद्दी पेपर मध्ये दिल्यास कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंढे साहेबांनी दिलेले असताना परळी शहरातील विक्रेते सर्रासपणे वर्तमानपत्राच्या रद्दी पेपर मध्ये जिलेबी, वडापाव समोसे मंचूरन फास्ट फूड विकताना दिसत आहेत. वर्तमानपत्रात वापरण्यात येणाऱ्या वाढीमुळे कॅन्सर सारखा मोठा आजार होतो या गोष्टीची कल्पना असताना सुद्धा परळी वैजनाथ शहरातील फास्ट फूड विक्रेते जाणीवपूर्वक परळी करांच्या आयुष्याशी खेळत आहेत या सर्व प्रकरणी तुकाराम मुंढे साहेबांनी फळ विक्रेते आणि फास्ट फूड विक्रेते यांच्यावर लवकरात लवकर कारवाई असे मत परळी वैजनाथ शहरातील नागरीकांमधून येत आहे.





